ll ॐ ॐकारा गुरुदेव दत्त ll
मठाची थोडक्यात माहिती
श्री क्षेत्र निखरे
भारतातील ऐतिहासिक शहरांपैकी राजापूर या शहरापासून २२ किमी अंतरावर व राजापूर रेल्वे स्टे. पासून अवघ्या ३ किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र निखरे हे छोटेसे खेडे गाव. श्री दत्तगुरु परंपरेतील सदगुरु श्री रामचंद्र योगी महाराजांचे जन्म स्थान, कर्म स्थान व प्रपंचातून परमार्थ साधत इथेच त्यांनी संजीवन जल समाधी घेतली. श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाने व महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परम पावन तपोभूमीला एकदा तरी भेट द्या व महाराजांच्या समाधीला नतमस्तक व्हा ! तुम्हाला महाराजांची दिव्य अनुभूती आल्याशिवाय रहाणार नाही.
गुरुपरंपरा
माणगावचे महान दत्तावतारी श्री वासुदेवांनंद टेंबे स्वामींचे लाडके शिष्य श्री शिवानंद टेंबे स्वामी होते. शिवानंद टेंबे स्वामींचे शिष्य नारायण शेठ होते. शिवानंद स्वामींनी भविष्यवाणी केल्या प्रमाणे नारायणांना गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी पुत्ररत्नाचा लाभ झाला. हेच ते आपले सदगुरु श्री रामचंद्र महाराज. त्यांना साक्षात श्री दत्तात्रेयांनी दर्शन देऊन गुरुमंत्र दिला. सदगुरु श्री रामचंद्र महाराजांना गुरुदिक्षा रत्नागिरी शिरगावातील श्री शरदचंद्र महाराजांनी दिली. सदगुरु महाराजांचे धाकटे चिरंजीव संतोष यांना दिक्षा सदगुरु श्री रामचंद्र महाराजांनी दिली. हेच आपले सर्वांचे लाडके सदगुरु श्री स्वामी माऊली.
स्वामीकार्य
हातात काम मुखात नाम घेत, प्रपंचातून परमार्थ साधत, घराचेच मंदिर बनवत भक्तांचा उद्धार करत सदगुरु माऊली भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करत रात्रंदिवस अविरत कार्य करत आहेत. अंधश्रधा, बळी परंपरा, वाईट परंपरा यांच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न माऊली करत आहेत. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. अनेक अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना अन्नधान्य, वस्त्र देत आहेत. भविष्यात वेदांसोबत अत्याधुनिक शिक्षण, वेदोक्त संशोधन केंद्र, अत्याधुनिक हॉस्पिटल असे अनेक सामाजिक प्रकल्प निर्माणाचे कार्य हाती घेतले आहे.
आत्मानुभव वर्ग
प्रथम: आरंभ साधना
(Ārambh Sādhanā)
- (Beginner Practice) — श्वास, शारीरशांती व आधारभूत जागरूकता. नामस्मरण शास्त्र
- कालावधी: एक महिना
- शुल्क: अंदाजे ११००/-
प्रथम: आरंभ साधना
(Ārambh Sādhanā)
- (Beginner Practice) — श्वास, शारीरशांती व आधारभूत जागरूकता. नामस्मरण शास्त्र
- कालावधी: एक महिना
- शुल्क: अंदाजे ११००/-
द्वितीय: स्थिरता साधना
(Sthiratā Sādhanā)
- (Stability Practice) — दीर्घ ध्यान, भावना निरीक्षण, एकाग्रता वाढवणे.नाम उच्चारण व स्पंदन शास्त्र बेसिक
- कालावधी: तीन महिने
- शुल्क: अंदाजे २१००/-
द्वितीय: स्थिरता साधना
(Sthiratā Sādhanā)
- (Stability Practice) — दीर्घ ध्यान, भावना निरीक्षण, एकाग्रता वाढवणे.नाम उच्चारण व स्पंदन शास्त्र बेसिक
- कालावधी: तीन महिने
- शुल्क: अंदाजे २१००/-
तृतीय: अनुग्रह साधना
(Anugraha Sādhanā)
- (Grace/Deepening Practice) — नामध्यान, प्रेमभाव (metta), ऊर्जा जागरूकता. दिर्घनाम उच्चारण व स्पंदन ऊर्जेचा जीवनावरील चमत्कारिक अनुभव
- कालावधी: तीन महिने
- शुल्क: अंदाजे ५१००/-
तृतीय: अनुग्रह साधना
(Anugraha Sādhanā)
- (Grace/Deepening Practice) — नामध्यान, प्रेमभाव (metta), ऊर्जा जागरूकता. दिर्घनाम उच्चारण व स्पंदन ऊर्जेचा जीवनावरील चमत्कारिक अनुभव
- कालावधी: तीन महिने
- शुल्क: अंदाजे ५१००/-
चतुर्थ: परमार्थ साधना
(Paramārtha Sādhanā)
- (Transcendence Practice) — मौन, साक्षीदृष्टि, अंतर्दर्शन — जीवनात परमार्थाचा आनंद साधणे. नामस्मरणातून ध्यानात एकाग्रता व ऐहिक जीवन यशस्वी बनवणे. यश मिळविण्यासाठी नाम एक राजमार्ग.
- कालावधी: पाच महिने
- शुल्क: अंदाजे ११०००/-
चतुर्थ: परमार्थ साधना
(Paramārtha Sādhanā)
- (Transcendence Practice) — मौन, साक्षीदृष्टि, अंतर्दर्शन — जीवनात परमार्थाचा आनंद साधणे. नामस्मरणातून ध्यानात एकाग्रता व ऐहिक जीवन यशस्वी बनवणे. यश मिळविण्यासाठी नाम एक राजमार्ग.
- कालावधी: पाच महिने
- शुल्क: अंदाजे ११०००/-
आत्मानुभव गुरुकुल
सद्गुरु श्री स्वामी माऊलींना सद्गुरु श्री रामचंद्र महाराजांनी दिलेल्या दीक्षेला आज २४ वर्षे झाली आहेत. माऊलींनी भक्तांना नामस्मरण, आसन, प्राणायाम, ध्यान व अध्यात्म साधनेचे योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी कधीच प्रपंचाचा त्याग करायला सांगितला नाही; उलट प्रपंचातूनच परमार्थ साधावा हे शिकवले. त्यांची शिकवण आहे – “हातात काम, मुखात नाम घेऊन घराचेच मंदिर बनवा.”
हजारो भक्तांचे जीवन त्यांनी बदलले, प्रपंच सुयोग्य केला व भक्ती जागवली. माऊली सांगतात – आजचे कर्म शुद्ध-सात्त्विक केले तर उद्याचा दिवस सुंदर होतो. खरे गुरु दुर्लभ आहेत; आपले भाग्य थोर आहे की अशा सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभते आहे.