श्री दत्तगुरु माऊली

भव्य दिव्य निर्माण

ll ॐ ॐकारा गुरुदेव दत्त ll

मठाची थोडक्यात माहिती

श्री क्षेत्र निखरे

भारतातील ऐतिहासिक शहरांपैकी राजापूर या शहरापासून २२ किमी अंतरावर व राजापूर रेल्वे स्टे. पासून अवघ्या ३ किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र निखरे हे छोटेसे खेडे गाव. श्री दत्तगुरु परंपरेतील सदगुरु श्री रामचंद्र योगी महाराजांचे जन्म स्थान, कर्म स्थान व प्रपंचातून परमार्थ साधत इथेच त्यांनी संजीवन जल समाधी घेतली. श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाने व महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परम पावन तपोभूमीला एकदा तरी भेट द्या व महाराजांच्या समाधीला नतमस्तक व्हा ! तुम्हाला महाराजांची दिव्य अनुभूती आल्याशिवाय रहाणार नाही.

गुरुपरंपरा

माणगावचे महान दत्तावतारी श्री वासुदेवांनंद टेंबे स्वामींचे लाडके शिष्य श्री शिवानंद टेंबे स्वामी होते. शिवानंद टेंबे स्वामींचे शिष्य नारायण शेठ होते. शिवानंद स्वामींनी भविष्यवाणी केल्या प्रमाणे नारायणांना गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी पुत्ररत्नाचा लाभ झाला. हेच ते आपले सदगुरु श्री रामचंद्र महाराज. त्यांना साक्षात श्री दत्तात्रेयांनी दर्शन देऊन गुरुमंत्र दिला. सदगुरु श्री रामचंद्र महाराजांना गुरुदिक्षा रत्नागिरी शिरगावातील श्री शरदचंद्र महाराजांनी दिली. सदगुरु महाराजांचे धाकटे चिरंजीव संतोष यांना दिक्षा सदगुरु श्री रामचंद्र महाराजांनी दिली. हेच आपले सर्वांचे लाडके सदगुरु श्री स्वामी माऊली.

स्वामीकार्य

हातात काम मुखात नाम घेत, प्रपंचातून परमार्थ साधत, घराचेच मंदिर बनवत भक्तांचा उद्धार करत सदगुरु माऊली भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करत रात्रंदिवस अविरत कार्य करत आहेत. अंधश्रधा, बळी परंपरा, वाईट परंपरा यांच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न माऊली करत आहेत. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. अनेक अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना अन्नधान्य, वस्त्र देत आहेत. भविष्यात वेदांसोबत अत्याधुनिक शिक्षण, वेदोक्त संशोधन केंद्र, अत्याधुनिक हॉस्पिटल असे अनेक सामाजिक प्रकल्प निर्माणाचे कार्य हाती घेतले आहे.

कृष्ण शिला पूजन

श्री दत्तमहाराज व त्यांच्या पत्नी अनघा देवी यांची मूर्ती विशेष अशा कृष्ण शिळेमध्ये बनविण्यात येत आहे. हे पाषाण महाराजांसाठी नर उग्र स्वरूपाचे पाषाण आहे तर आई अनघा देवींसाठी शीतल मादी स्वरूपाचे आहे. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमाने ही पाशाने मिळाली. शिलापूजन प्रत्यक्ष सदगुरु श्री स्वामी माऊलींनी केले. मूर्तिनिर्माणाचे काम अंतिम टप्यावर असून लवकरच प्राणप्रतिष्ठापणा होऊन भक्तार्पण केले जाईल.

या शतकातील महा निर्माण

श्री दत्तात्रेय
अनघा देवी

मूर्ती रहस्य

सगुणातून निर्गुणाकडचा प्रवास म्हणजे सगुणोपासना. मूर्ती म्हणजे एक प्रकारे यंत्रच आहे. ज्याच्या विशिष्ट पद्धतीने मांडणी करून त्याची निर्मिती केली जाते. त्यातून ईश्वराचे गुण वर्णन होतात. त्याच्याकडे पाहिल्याने मनुष्यातील अवगुणांचा नाश होतो तसेच नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन सद्गुणांचा व सकारात्मक ऊर्जेची अनुभूती येते. म्हणूनच मूर्ती पूजेला प्राधान्य दिले आहे. ईश्वराची मूर्ती म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे भांडारच.

श्री दत्तात्रेय व अनघादेवी

संसारातून परमार्थ साधण्याचा संदेश अवघ्या जगाला देण्यासाठीच श्री दत्त महाराज व त्यांच्या पत्नी सौ. अनघा देवींची मूर्ती निर्माण होत आहे. श्री दत्त महाराज हे महायोगी तपस्वी मुद्रेत असून द्विभुज आहेत. काखेत झोळी, हातात कमंडलू व त्रिशूळ धारण केलेले, आशीर्वाद देतांना आहेत. आई अनघादेवी मोक्षदायिनी असून वरद लक्ष्मीच्या रूपात आहेत. सोबत चार श्वान व गौमाते सह या मूर्ती असणार आहेत.

मूर्ती निर्माण

श्री दत्तगुरूंची व अनघादेवींची मूर्ती ही आठ फूट उंचीची असणार आहे. या मूर्ती घडविण्यासाठी खास अशा कृष्ण शिळेची निवड करण्यात आली आहे, ज्याचे आयुर्मान किमान पाच हजार वर्ष असणार आहे. सुप्रसिद्ध गुड्डीगार समाजातील नामवंत मूर्तिकार भार्गव बंधू मूर्ती घडवत आहेत.

आवाहन

या श्री दत्तगुरूंच्या कार्यात फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्हाला भिक्षा घाला, आणि या महान कार्यात सहभाग घ्या. तसे सांगणे चुकीचे आहे. परंतु धनराशी उभी करण्यासाठी कमीत कमी रुपये पंधराशेची ( ₹ १५००/-) आणि जास्तीत जास्त जमेल तेवढी मदत व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो.

एक हात मदतीचा !

अवधूता तुला माझी रे चिंता .
किती हाका मारू तुला गुरुदत्ता .

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे

श्री स्वामी समर्थ मठ निखरे - राजापूर

मु. निखरे पो. केळवली, ता. राजापूर जि. रत्नागिरी ( महाराष्ट्र ) ४१६७०२

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 703 103 1111

Scroll to Top